रायगड जिल्ह्यातील मोठी आर्थिक उलाढाल म्हणून नेरळ ग्रामपंचायतीची ओळख होती. मात्र नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार हाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे व कर्मचारीवर्गावर अंकुश नसल्याने थकीत घरपट्टी व पाणीपट्टी ज्या प्रमाणे वसुल झाली नसल्याने मोठी आर्थिक उलाढाल म्हणून ओळख आसलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमधील महसूल वाढीचे उद्दिष्ट राहिल्याचे चित्र दिसत असताना, थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करीता सत्ताधाऱ्यानी पाऊल आपेक्षा असताना, मात्र नेरळ ग्रामपंचायत विसर्जित झाल्या नंतर नेमण्यात आलेल्या प्रशासका कडून थकीत लाईट बिल भरणा व विकास कामांना चालना तसेच कामगारांचे थकीत वेतन देणे व ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी महत्वाचा निर्णय घेत थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करीता घरपट्टी व पाणीपट्टी धारकांना नोटीसा बजावण्यास सुरवात करण्यात आली आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठया प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे झाली असुन, काही कामे सुरू देखील आहे. तर ग्रामपंचायत हद्दीतील येणाऱ्या आनंदवाडी, कोबंळवाडी भागात मोठया प्रमाणात चाळींची बांधकाम झाली आहेत. तर नेरळ ग्रामपंचायतीची सध्या लोकसंख्या अंदाजे ३० ते ३५ हजाराच्या पार गेली आहे. असे असताना देखील मात्र नेरळ ग्रामपंचायतीतील आर्थिक उत्पन्नांचे गणित जुळत नसल्याने, व याचे मुख्य कारण म्हणजे नेरळ ग्रामपंचायतीचा कार्यभार हाकणारे सत्ताधारी यांच्या कडून ज्या पध्दतीने नेरळ ग्रामपंचायतीचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेली घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर ज्या पद्धतीने भर देणे अपेक्षित असताना, त्या पद्धतीने नियोजन शुन्य कामकाज व कामगारांवर नसलेला अंकुश नसल्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचा मुख्य आर्थिक स्त्रोत घसल्याचे चित्र स्पष्ट दिसुन येत असल्याने, नेरळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य व पाणी विभागातील कर्मचारी यांना चार ते पाच महिन्याच्या पगारासाठी वंचित राहण्याची वेळ आली असल्याचे व चार ते पाच महिन्याच्या हक्काच्या पगारासाठी उपोषण व आंदोलनाचा मार्ग अवलंबाल्याची वेळ ही संपूर्ण नेरळकरांनी पाहिले व न्यात आहे.
मात्र नेरळ ग्रामपंचायती मध्ये साधारणपणे १४ हजार मालमत्ता येत असुन, अंदाजे वर्षाला अडीच कोटींचा महसूल जमा होणे क्रमप्राप्त होते. मात्र काही ठराविक मालमत्ताधारक हे अनेक वर्षे मालमत्ता कर भरत नसल्याने व वसुली करता सत्ताधारी कमी पडले का? असा प्रश्न नेरळकरांनाकडून उपस्थित होत असताना, दि. १८ जुलै २०२४ रोजी सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी दीलेल्या राजीनाम्यानुसार कोंकण विभाग यांच्या न्यायालयाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४५ (१- अ ) नुसार नेरळ ग्रामपंचायत विसर्जित केल्याचा आदेश पारित करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून नेरळ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून सुजित धनगर यांची नियुक्ती करण्यात आल्या नंतर नेरळ ग्रामपंचायतीचा खुंटलेला आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी व थकीत लाईट बिल भरणा व विकास कामे तसेच आरोग्य व पाणी विभागातील कर्मचारी यांचा थकीत वेतन अदा करण्यासाठी प्रशासक सुजित धनगर यांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून अंदाजे एक ते दीड कोटीची वसुली करीता महत्वाचा निर्णय घेत नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साधारणपणे दोन हजार घरपट्टी धारक व एक हजार पाणीपट्टी धारक यांना नोटीसी बजावण्याचे कामाला सुरवात करण्यात आली आहे. या घरपट्टी व पाणीपट्टी वसुली संदर्भात नेरळ ग्रामपंचायत आज दि. १४ डिसेंबर रोजी मा. न्यायालयात देखील गेली आहे.
——————————-
नेरळ ग्रामपंचायतीची ओळख ही जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेली ग्रामपंचायत म्हणून होती. मात्र नेरळ ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी यांनी ग्रामपंचायतीचा मुख्य आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रमुख भाग असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी आपल्या अधिकाराचा योग्य वापर न केल्याने व त्यांच्या भोंगळ कारभारामुळे ही वसुली झाली नसल्याने मोठी आर्थिक उलाढळ म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीवर आर्थिक स्त्रोत खुंटण्यावेळ ही सत्ताधारी यांच्यामुळे आली असुन, सरपंचाच्या मनमानी कारभाराचे कारण पुढे करत सत्ताधारी व विरोधक यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्या नंतर व नेरळ ग्रामपंचायत विसर्जित झाल्यावर नेमण्यात आलेल्या प्रशासका कडून नेरळ ग्रामपंचायतीचा खुंटळेला आर्थिक स्त्रोत सावरण्यासाठी व थकीत लाईट बिल भरणा व विकास कामे तसेच आरोग्य व पाणी विभागातील कर्मचारी यांचा थकीत वेतन अदा करण्यासाठी जो थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करीता घरपट्टी व पाणीपट्टी धारकांना नोटीसी बजवण्याचा घेतलेला महत्वपूर्ण निर्णय व घेतलेल्या निर्णयानुसार नोटीसी बजावण्याचे सुरू झालेले काम हे कौतुकास्पद आहे.जे नेरळ ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना जमले नाही ते मात्र प्रशासकाने आपला अधिकार वापरत जमवले आहे.
…आनंद (नंदू) मोडक, नेरळ शहर अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष