‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर भावुक : “शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत जन्मलो, हे आमचं भाग्य!”

Chava director
पोलादपूर (शैलेश पालकर) :
जगाने ज्यांच्या युध्दनितीचा आणि गनिमीकाव्यांचा अभ्यास सुरू केला. ज्यांचे थोडया-थोडक्या वर्षांमध्ये हिंदवी स्वराज्य साकारण्याचे यशस्वी प्रयत्न अभ्यासले. औरंगजेबासारख्या पातशहासमोरची खिल्लत लाथेने उडवित दिल्लीच्या तख्तावरून महाराष्ट्रात थडगे बांधण्यासाठी जणू निमंत्रण दिले त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनभूमीत आपण जन्मलो हे आपणासर्वांचे भाग्य आहे, असे कृतज्ञतापूर्वक भावूक उदगार ‘छावा’चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्यक्त केले.
‘आपली माती आपली माणसं’तर्फे नरवीर पुरस्कार वितरण, सर्व माध्यमिक शाळांच्या दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन् हेल्मेट वाटपाचा तसेच शेतकऱ्यांना रोप वाटपाचा कार्यक्रम पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील श्रीवरदायिनी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपिठावर माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, उद्योजक रामदास कळंबे, रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन हनुमंत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय सलागरे, माजी सभापती दिलीप भागवत, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, भाजप अध्यक्ष वैभव चांदे, कापडे सरपंच अदिती मोरे, तहसिलदार कपिल घोरपडे, सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे, महावितरणचे अभियंता चोरमले, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, सहसंपर्कप्रमुख किशोर जाधव, ज्ञानोबा केसरकर, माजी सभापती शैलेश सलागरे, उद्यानपंडित रामचंद्र कदमशेठ, सिनेअभिनेते हरिओम घाडगे, ‘आपली माती आपली माणसं’चे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, सेक्रेटरी संजय उतेकर, कृउबा समितीचे संचालक लक्ष्मण मोरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, आपणा सर्वांना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची या मातीशी बांधिलकी त्यांच्याच शब्दात ऐकण्याची संधी मिळाली. चित्रपट अनेक निघतात पण ‘छावा’ सारखाच एखादाच जगाचे लक्ष वेधून घेतो त्यामागे लक्ष्मण उतेकरांसाठी तळमळ व परिश्रम असावे लागतात, असे सांगून  पोलादपूरच्या खऱ्या वारसदारांचा सत्कार करणाऱ्या ‘आपली माती आपली माणसं’चे संस्थापक राज पार्टे यांच्या गेल्या आठ वर्षांपासूनच्या प्रयत्नांना सर्वपक्षिय सर्व समावेशक असे व्यासपिठ प्राप्त झाले असून याठिकाणी समाज, प्रशासन आणि राजकीय व पत्रकार क्षेत्रातील सर्वांचीच भरगच्च उपस्थिती या संघटनेला सर्वस्तरातून मिळणारा प्रतिसाद किती आपुलकीतून आहे, याचे द्योतक असल्याचे सांगून मंत्री भरतशेठ गोगावले आणि भाजप आमदार प्रवीणभाऊ दरेकर यांनी उशिर होणार असल्याने येत नसल्याचे कळविले, असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी कापडे येथील वरदायिनी माध्यमिक विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत आधारकार्ड, ऍग्रोस्टॅक, पीएम किसान, जीवंत सातबारा मोहिम, शिधापत्रिका, संजय गांधी व इंदिरा गांधी योजना, नैसर्गिक आपत्तीशेती नुकसान, नवीन मतदान नोंदणी विविध दाखले वाटपाचे आयोजन करण्यात आल्याचे तहसिलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले. उद्योजक रामदास कळंबे यांनी येत्या पाच वर्षांमध्ये 100 तरूणांना रोजगार देण्याचे उद्दीष्ट असल्याचे सांगून तालुक्यात रोजगार निर्मिती करून शहरातील लोकसंख्या पुन्हा गावाकडे येईल, असे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी शारिरीक शिक्षक संघटनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष किसन सुरवसे, संस्थापक राज पार्टे, राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, अमर कदम हा ड्रॅगन्स फ्रुटसची शेती करणारा तरूण, तीर्थयात्रा घडविणारे लक्ष्मण खेडेकर, वैद्यकीय मदत कक्ष समाजसेवक कृष्णा कदम, गोरक्षक दीपक बाबाजी उतेकर, मुख्याधिकारी सिंधुदूर्ग स्वप्नील कदम, बडोदातील उद्योजक कल्पेश साने व विश्वनाथ पार्टे, सुशिक्षित शेतकरी विजय रिंगे, समाजसेवक योगेश रिंगे, तानाजी रिंगे व रामशेठ साळवी, डॉ.गुलाबराव सोनवणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण अध्यक्ष शैलेश पालकर, युटयूब संपादक मिलींद खारपाटील, रामदास कळंबे, सुनील चव्हाण तसेच अन्य मान्यवरांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी दहावीतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या विद्यार्थी विद्याथाअनींचा सत्कार, 45 समाजसेवकांचा सत्कार आणि 100 मोटारसायकलस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी पार्टे, तसेच सहकाऱ्यांनी केले. यावेळी ‘आपली माती आपली माणसं’च्या स्वयंसेवकांनी शिस्तबध्दतेने सर्वप्रकारचे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *