गर्लफ्रेंडच्या दर्शनाचा हट्ट पडला महागात; आख्खं कुटुंब रूग्णालयात

Murud police thane
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात आदिवासी समाजावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहा तालुक्यातील भालगाव आदिवासी वाडीतील वाघमारे कुटुंबीयांवर मिठाघर येथील नऊ जणांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. यामध्ये साहिल वाघमारे, संगिता वाघमारे, चंदर वाघमारे, राम वाघमारे व सागर वाघमारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेमागे वाघमारे यांच्या मुलाने मुरुड तालुक्यातील मुलीकडे गणेश दर्शनासाठी गेल्याचा राग असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी मंगेश महादेव वाघमारे यांनी मुरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी मुरुड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ चे विविध कलम तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *