कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी मंदिरात चोरी; चांदीचा मुखवटा व तीन देवमूर्त्या गायब

Revdanda kulswami mandir
रेवदंडा | सचिन मयेकर 
रेवदंडा मोठा कोळीवाडा येथील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे (२२ नोव्हेंबर २०२५) चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मंदिरातील देवस्थानात ठेवलेले चांदीचे पवित्र देव चोरीस गेले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी कुलस्वामिनी देवीचा चांदीचा मुखवटा तसेच खंडेरायाच्या तीन चांदीच्या मूर्त्या चोरून नेल्या आहेत. या सर्व वस्तूंची एकूण अंदाजे किंमत दीड ते पावणे दोन लाख रुपये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कुलस्वामिनी आणि खंडेराय हे कोळी समाजाचे अत्यंत श्रद्धेचे देव मानले जात असल्यामुळे या चोरीमुळे समाजभावना तीव्र दुखावल्या आहेत. मोठा कोळीवाडा परिसरात या घटनेची मोठी चर्चा होत असून पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *