कोलाड रोहा मार्गांवर स्कुटीची मोटार सायकला जोरदार धडक, दोन ठार, दोन जखमी, संभे गावानजिक घटना

Fatal accident between two bikes on Roha-Kolad road
कोलाड | श्याम लोखंडे 
कोलाड रोहा मार्गांवर संभे गावाच्या हद्दीतील मोरी जवळ स्कुटी चालक यांनी मोटार सायकल चालकाला जोरदार धडक दिली या अपघातात दोन जन ठार तर दोन जन जखमी झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार दि.५/१२/२०२५ रोजी रात्री २१.३० च्या सुमारास दिनेश भिकू पवार हा त्याच्या ताब्यातील होंडा शाईन मोटार सायकल क्र.एम.एच.०६बि. जे. ३३१८वरून धाटाव ते कोलाड असा प्रवास करीत असतांना यातील मयत आरोपी स्कुटी चालक जावीर इब्राहिम शाह रा. धाटाव ता.रोहा यांने आपल्या ताब्यातील स्कुटी एम. एच.०६सी.बी. ३७०१ही स्वतः चालवीत त्या स्कुटीच्या पाठीमागे जखमी साक्षीदार याला बसवून कोलाड ते धाटाव असा प्रवास करीत असतांना मौजे संभे गावाच्या हद्दीत मोरिजवळ आले असता यातील मयत दिनेश भिकू पवार याच्या ताब्यातील होंडा शाईन मोटार सायकल यास रॉंग साईडला येऊन जोरदार धडक दिल्याने या अपघातात दिनेश भिकू पवार याच्या मरणासह स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरले.
या अपघातात दिनेश भिकू पवार, विठ्ठल नगर, पो. रातवड,ता. माणगांव,जि. रायगड तसेच जावीर इब्राहिम शाह रा. धाटाव मुळगाव सिधावे टोला रामटोकोला कसीया कशिनगर उत्तरप्रदेश, हे दोघे जन ठार तर अशपाक मोहम्मद फारूख अली, रा. वार्ड नं.१०शक्ती नगर कसीया कुशीनगर उत्तरप्रदेश व मोहन पवहारी सिंग रा. सिधावे टोला रामटोकोला कसीया कुशीनगर उत्तरप्रदेश हे दोघे जन जखमी झाले आहेत. याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे सो. रोहा, सपोनि कुलकर्णी सो. नागोठणे पोलिस कार्यभार कोलाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिस अंमलदार पोसई भोजकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *