छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवर वृद्ध व अपंग व्यक्तींना देखील रायगड किल्ला पाहता यावा यासाठी रायगड रोपवे उभारला गेला हाच रोपवे रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना अखंड सुविधा देतो मात्र वार्षिक तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी २३ ते २८ फेब्रुवारी रोजी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे रायगड रोपवे चे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकार स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर असंख्य शिवभक्तांना व पर्यटकांना रोपवेच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचे दर्शन वर्षभर होत असते मात्र यात रोपवेची वार्षिक तांत्रिक देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने चालू वर्षी २३ फेब्रुवारी ते२८. फेब्रुवारी या काळात रायगड रोपवे ची सेवा पूर्णता बंद राहील व १ मार्च २०२६ पासून रोपवे सेवा पर्यटकांच्या सेवेसाठी सुरळीतपणे सुरू राहील पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रोपवे प्रशासनाकडून पर्यटकांच्या माहितीसाठी आगाऊ माहिती देण्यात आली आहे.
रायगड रोपवे बंद राहणार असल्याने पायरी मार्ग जाणाऱ्या शिवभक्तांची व पर्यटकांची संख्या मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने मार्गाकडे जाणारा रस्ता या काळात वाहतूक कोंडीत पुन्हा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.