किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस पलटी!

A minibus on a trip to Raigad Fort overturned!
महाड | मिलिंद माने 
ऐतिहासिक किल्ले रायगड कडे जाणाऱ्या रस्त्याची जागोजागी झालेली दुरावस्था व अर्धवट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या खाजगी मिनीबसला नांदगाव बुद्रुक येथे पलटी होऊन अपघात झाल्याने सहाजण जखमी झाले असून यामध्ये चार विद्यार्थिनी, शिक्षक व चालकाचा समावेश आहे.
किल्ले रायगड कडे जाणाऱ्या बसला नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे अक्षरा अजय ढोवळे वय 16, आदिती रवींद्र खेरमोडे वय 16, आदिती दीपक खाडे वय 16, सिद्धी दीपक ढोवळे वय 16, योगेश वसंतराव जाधव चालक वय 35 जगन्नाथ विश्वास येवले, शिक्षक वय 45 अशी सर्व जखमींची नावे असून ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी आहेत.
या सर्व पर्यटकांवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचार करण्यात आले असून त्यापैकी आदिती खेरमोडे हिची दुखापत गंभीर असल्याकारणाने तिला सिटीस्कॅनसाठी माणगाव येथे पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.
सांगली जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल,बाऊच,तालुका वाळवी जिल्हा सांगली या शाळेतील हे विद्यार्थी असून शनिवारी रात्री 11 वाजता ते खाजगी मिनीबसने सहलीसाठी निघाले होते, पहाटे 5.50 च्या सुमारास महाडकडून किल्ले रायगडकडे जाताना नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास तालुका पोलिसांमार्फत सुरू आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होत असताना ठेकेदारावर मात्र कोणतीही आजपर्यंत कारवाई झालेली नाही ती होणार देखील नाही कारण राजकीय स्पर्धा असल्यामुळे स्थानिक नागरिकांचे दररोज होत असलेल्या अपघात पर्यटकांच्या गाड्यांना होणाऱ्या अपघात यातून कारवाई कोणी कोणावर करायची अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असताना राष्ट्रीय महामार्ग खात्याचे महाड येथील अधिकारी मात्र वातानुकूलित कार्यालयात बसून कागदी घोडे नातवण्याचे काम करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *