कारला लागलेल्या आगीत उरण मधील आख्ख कुटुंब थोडक्यात बचावलं

Acident fire
उरण (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहेमद कुट्टी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. रुबीना इकबाल कुट्टी (पत्नी), नोफ व अजीझा (मुली) आणि उमर (मुलगा) – हे सर्वजण एकत्र प्रवासाला गेले होते.
२१ मे रोजी त्यांनी रत्नागिरी, गोवा, मंगळूर असा फिरता प्रवास सुरु केला. प्रवासादरम्यान, २३ मे रोजी सकाळी ५:३० वाजता, ते मारुती एर्टिगा (MH 46 CV 6557) या कारने कासरगोडजवळील चरकाला परिसरातून जात होते. यावेळी कारमधून अचानक धूर निघू लागल्याने रुबीना कुट्टी यांनी प्रसंगावधान राखून कार रस्त्याच्या बाजूला पार्क केली.
सर्वांनी तात्काळ कारमधून बाहेर पडत सुरक्षित अंतरावर उभे राहिल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, कारमध्ये भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. वाहनाचे जवळपास संपूर्ण नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत इकबाल कुट्टी कुटुंबाने कासरगोड जिल्ह्यातील विद्यानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कलम ३०६(१)(C)(FA) अंतर्गत FIR नोंदवली असून, कारला आग लागण्याचे नेमके कारण काय होते, कोणती यांत्रिक बिघाड किंवा अन्य कारण यामागे होते का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *