कळंबोली पुलाजवळ मोठे होर्डिंग कोसळले

पनवेल | प्रतिनिधी 
कळंबोली सर्कल ते मुंब्रा रोडवरील कळंबोली पुलाच्या सुरुवातीला उभारलेले मोठे लोखंडी होर्डिंग मंगळवारी अचानक कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
होर्डिंग अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि वाहतुकीचा वेग मंदावला. मात्र, त्या वेळी होर्डिंगच्या खाली कोणतेही वाहन किंवा नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पडलेले लोखंडी स्ट्रक्चर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर पुलावरील होर्डिंगच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा संरचनांची तातडीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.