कर्जत-खालापूरमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद उफाळला; शिवसेना-राष्ट्रवादी गटात कोल्ड वॉर

कर्जत-खालापूरमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद उफाळला; शिवसेना-राष्ट्रवादी गटात कोल्ड वॉर
कर्जत (गणेश पवार) : 
कर्जत-खालापूर मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिकामुळे महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
१ जून रोजी महाड येथे झालेल्या भरत गोगावले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर वाद पेटला. आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली, तर ३ जून रोजी सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्यावर गुन्हेगारी आणि गैरकारभाराचे गंभीर आरोप केले.
त्यानंतर ६ जूनच्या बैठकीत थोरवे यांनी भरत भगत आणि तटकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आणि राजीनाम्याचे आव्हान दिले. ७ जून रोजी भरत भगत यांनीही प्रत्युत्तर देत आर्थिक आणि ऐतिहासिक संदर्भ दिले.
या वादामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या एकजूटपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *