उरणमध्ये महिला भजन स्पर्धेला भरगोस प्रतिसाद – मंत्री आदिती तटकरेंकडून कार्यक्रमाचं कौतुक

उरणमध्ये महिला भजन स्पर्धेला भरगोस प्रतिसाद - मंत्री आदिती तटकरेंकडून कार्यक्रमाचं कौतुक
उरण (विठ्ठल ममताबादे ) :
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिला भजन स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जे.एन.पी.ए. वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत १३ भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. फक्त १० वर्षांच्या चिमुकल्या तबलावादक ओमकार कराळेने प्रेक्षकांचे मन वेधून घेतले.
या भजन स्पर्धेला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन आयोजक व स्पर्धकांचे कौतुक केले. विजेत्या मंडळांसह उत्कृष्ट तबलावादक आणि उत्कृष्ट गायिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेत प्रथम क्रमांक आई भवानी प्रासादिक भजन मंडळ (सांताक्रूझ पूर्व), द्वितीय क्रमांक आई एकविरा महिला भजन मंडळ (दुंदरेपाडा), तृतीय क्रमांक ओम साई भजन मंडळ (खरसुंडी खालापूर) यांनी पटकावला.
आदिती तटकरे यांनी यापुढे जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा घेण्याची घोषणा केली. या उपक्रमामुळे उरण तालुक्यातील भजनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पारंपरिक संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
Pintya jahirat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *