इंडियन ओव्हरसिज बँक (भारत सरकारचा उपक्रम), चेन्नई येथे २०२५-२६ या वर्षासाठी लोकल बँक ऑफिसर (JMGS-I) पदांच्या ४०० जागांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना (Advt. No. HRDD/RECT/01/2025-26 dt. 12.05.2025) प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान अनिवार्य असून, महाराष्ट्रासाठी ४५ पदे उपलब्ध आहेत.
🧾 पदाचा तपशील व आरक्षण (महाराष्ट्र):
एकूण पदे: ४५
अजा (SC): ७
अज (ST): ३
इमाव (OBC): १२
ईडब्ल्यूएस: ५
खुला प्रवर्ग: १८
दिव्यांग (OC व ID प्रवर्गासाठी प्रत्येकी १ पद राखीव)
📍 इतर राज्यातील पदसंख्या:
तामिळनाडू (तमिळ) – २६०
गुजरात (गुजराती) – ३०
प. बंगाल (बंगाली) – ३४
पंजाब (पंजाबी) – २१
ओरिसा (ओडिया) – १०
🎓 शैक्षणिक पात्रता (१ मे २०२५ रोजी):
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र.
🎂 वयोमर्यादा:
२० ते ३० वर्षे
सूट: OBC – ३ वर्षे, SC/ST – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे
💰 वेतनश्रेणी:
स्केल-I (Assistant Manager): ₹48,480 – ₹85,920
डीए, एचआरए, इ. वेतन घटक नियमांनुसार मिळणार
📅 प्रोबेशन कालावधी:
२ वर्षे
📚 निवड प्रक्रिया:
ऑनलाइन परीक्षा (Total: १४० प्रश्न | २०० गुण | ३ तास)
Reasoning & Computer Aptitude: ३० Q | ६० गुण | ६० मि.
General/Economy/Banking Awareness: ४० Q | ४० गुण | ३० मि.
Data Analysis & Interpretation: ३० Q | ६० गुण | ६० मि.