‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’मध्ये ५३७ अॅप्रेंटिस पदांची भरती

Indian oil
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या भारत सरकारच्या उपक्रमामार्फत देशभरातील ५ झोन्समध्ये एकूण ५३७ अॅप्रेंटिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वेस्टर्न रिजन पाईपलाईन्स (WRPL) मध्ये १५२, ईस्टर्न रिजन पाईपलाईन्स (ERPL) मध्ये १५६, नॉर्दर्न रिजन पाईपलाईन्स (NRPL) मध्ये ९७, सदर्न रिजन पाईपलाईन्स (SRPL) मध्ये ४० आणि साउथ ईस्टर्न रिजन पाईपलाईन्स (SERPL) मध्ये ८५ पदांचा समावेश आहे.
या भरती अंतर्गत टेक्निशियन अॅप्रेंटिस (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम/इन्स्ट्रुमेंटेशन), ट्रेड अॅप्रेंटिस (ह्युमन रिसोर्स, अकाउंट्स) तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटर (फ्रेशर/स्किल सर्टिफिकेट धारक) पदांसाठी संधी उपलब्ध आहे. उमेदवारांनी संबंधित पात्रता परीक्षा २८ फेब्रुवारी २०२० नंतर किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक असून, अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना ४५% गुणांपर्यंत सवलत आहे. वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे असून, आरक्षित गटांना नियमाप्रमाणे सूट देण्यात येणार आहे. अॅप्रेंटिसशिपचा कालावधी १२ महिने असून उमेदवारांना नियमानुसार मासिक स्टायपेंड दिले जाईल.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून, संबंधित उमेदवारांनी NATS/NAPS पोर्टलवर नोंदणी करून Indian Oil Pipelines portal https://plapps.indianolpipelines.in/ येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी IOCL च्या संकेतस्थळावर (iocl.com) भेट द्यावी किंवा WRPL संदर्भातील शंका wiplapprentice@indianol.in या ई-मेलवर पाठवाव्यात.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *