महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिला धमकावल्याप्रकरणी एका २५ वर्षीय महिलेविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाडएमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बिरवाडी येथील एका घरात ही घटना घडल्याची तक्रार आहे. भाग्यश्री नितीन गोधावडे (रा. बापटनगर, बिरवाडी) या महिलेने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित मुलीच्या आईला मारून टाकण्याची धमकी धमकी दिल्याचा आरोप दाखल करण्यात आलेल्याफिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीत विरोधात २७ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३५१ (२), ७४ व ७९ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) अधिनियमातील कलम ८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी पोलीस शिपाई फाळके तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरेगावकर व सहाय्य पोलीस निरीक्षक श्री रावडे हे करीत आहेत