अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीत एका अल्प वयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या महिटिनुसार, अलिबाग तालुक्यात असलेल्या पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीत अल्प वयीन पीडिता हिला आरोपी पंकज ऊर्फ वरुण यादव याने तिच्या आई वडिल आणि भाऊ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत दिनांक दि.११/०९/२०२५ ते दिं.२६/०९/२०२५ दरम्यान आरोपी याच्या रुममध्ये तक्रारदार हिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
याबाबत पोयनाड पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अशोक मरस्कोले करीत आहेत.
आरोपी पंकज ऊर्फ वरुण यादव याला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच तो उत्तर प्रदेश येथे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.