अल्पवयीन मुलीचा विनयभंग – अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Alibag police thane
अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेचे तिच्या मित्रांसोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. हा प्रकार मे २०२४ पासून ते १९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सुरू होता. धमकीच्या आधारे आरोपीने वारंवार अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.
सदर प्रकरणी पीडितेने अखेर २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी विशेष पथक तयार केले असून, पुढील तपास सुरू आहे.
या गुन्ह्याची नोंद होऊ नये म्हणून काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा अलिबाग शहरात रंगली आहे. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला न जुमानता गुन्हा दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या भूमीचा मान राखण्यासाठी अशा नीच कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. समाजानेही अशा घटनांविरुद्ध एकत्र येत “बळी नको, बचाव हवा” असा निर्धार करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *