अलिबाग नगर परिषद प्रभाग क्रमांक २ (अनुसूचित जमाती महिला राखीव) येथे उच्चशिक्षित B.Sc. Chemistry पदवीधर आणि व्यावसायिक न्यूमरोलॉजिस्ट, अॅस्ट्रोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर तसेच रेकी हिलिंग ग्रँडमास्टर असलेल्या सुजाता रमेश इंगळे यांनी आज रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रवेशामुळे अलिबागमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभागात नव्या उत्साहाची लहर असून, भाजपच्या या रणनीतिक पावलामुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास भाजपचे खासदार धैर्यशील पाटील, भाजपचे वरिष्ठ नेते आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस महेश मोहिते, पप्पू शेट पाटील, धारप, तनुजा पेरेकर, संजय पाटील, इम्रान घट्टे तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह, सुजाता इंगळे यांचे व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यातील त्यांचा प्रभाव पाहता, ही लढत अत्यंत रोमहर्षक ठरणार आहे. मतदारांमध्येही प्रचंड उत्सुकता असून, सुजाता इंगळे यांचा विजय निश्चित असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात वेग घेत आहेत. त्यांच्या आधुनिक, सुसंस्कृत आणि समाजाभिमुख प्रतिमेमुळे प्रभागातील मतदारसंघ अधिक सक्रिय झाला आहे.
सुजाता रमेश इंगळे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक २ मधील राजकीय गणित नव्याने मांडले जात आहे. आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका फक्त मतांसाठीच नव्हे, तर प्रभागाच्या विकासदृष्टीकोन, सामाजिक बदल आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. विरोधकांसाठी ही लढत मोठे आव्हान ठरणार असून, भाजपने सुजाता इंगळे यांच्या रूपाने एक प्रभावी आणि चर्चेत राहणारा चेहरा उभा केला आहे.