पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील गेट जवळ असलेल्या मेडिसिटी मेडीकल समोर उभी करून ठेवलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
प्रभाकर पाटील यांनी त्यांची 70 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची ऑटो रिक्षा क्र.एमएच-06-बीव्ही-3762 काळ्या पिवळ्या रंगाची सन 2021 चे मॉडेल असलेली रिक्षा सदर ठिकाणी उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रिक्षा चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.