अंबरनाथ व उल्हासनगर तालुक्यातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरे आणि शहरे तसेच औद्योगिक वसाहती यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर धरण बांधण्याचे सरकारचे धोरण आहे. १९७३ पासून धरण शासनाच्या पटलावर आहे. अद्याप कागदावरच आहे.
दरम्यान स्थानिक शेतकर्यांच्या विरोधामुळे या प्रस्तावित धरणाच्या कामाचे सर्वेक्षण रखडले होते. आता पुन्हा ठाणे जिल्ह्यातील राजकारणी मंडळी कडून पोशीर धरणाचा विषय पुढे आणला जात असल्याने स्थानिक सहा गावातील शेतकऱ्यांनी शेकापचे नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार जयंत पाटील यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे निवेदन देत मागणी केली होती. त्याप्रमाणे बोरगाव येथे शतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आमचा शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे आश्वासन बोरगाव बैठकीत दिले आहे.
भीमाशंकर अभयारण्य डोंगरात उगम पावलेल्या पोश्री नदीवर बोरगाव व कुरुंग गावांच्या हद्दीत धरणाची मुख्य भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायतीमधील भागात धरण बांधण्याचे धोरण सरकारने १९७३ मध्ये जाहीर केले होते. तर शासना कडून १९८० ला या प्रकल्पला मंजुरी देण्यात आली होती. .मात्र २००५ पर्यंत हा प्रस्ताव सरकारने बासनात बांधून ठेवला होता. २००५ मध्ये बोरगाव येथे धरण बांधण्याचे निश्चित झाल्यावर पहिल्यांदा प्राधिकरणाकडून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला.
मात्र धरणासाठी आपल्या शेतजमिनी जाणार मात्र धरणाचे पाणी ठाणे जिल्ह्याला देणार हा विषय समजतात बोरगाव, चई, चेवणे, उंबरखांड, भोपळेवाडी, पेंढरी व बोंडशेत या गावातील जनाता व स्थानिक शेतकर्यांनी एकत्र येत संघर्ष समिती तयार करून या धरणाच्या विरोधात सर्वेक्षणाचे एक टक्कादेखील काम पुढे जाऊ दिले नाही. तर आजही या सर्व गावातील शेत जमिनीवर पावसाळ्यात भाताची शेती व उन्हळ्यात भाजीपाला तसेच कडधान्य यांची शेती केली जाते. आता पुन्हा ठाणे जिल्ह्यातील राजकारणी मंडळी कडून पोशीर धरणाचा विषय पुढे आणला जात असल्याने व स्थानिक सहा गावातील शेतकऱ्यांनी शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी केल्याप्रमाणे तयार करण्यात आलेल्या संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी बोरगाव येथे आयोजित बेठकीला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची उपस्थिती लाभली होती.
या दरम्यान धरणाच्या विरोधाच्या वेळी मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. मात्र या मध्ये मी माझ्या शेतकरी पक्षाचे राजकारण तुमच्या समितीमध्ये आणणार नाही, असे आश्वासन देत. तुम्ही म्हणत असाल तर आपल्या जमीन द्यायची नाही. जर आपणा सर्वांना शासन आपल्याला जमिनीच्या बदल्यात काय देणार आहे? या प्रश्नाचा ही अभ्यास करावा लागेल अशी सूचना जयंत पाटील यांनी केली. तसेच सिडको व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा संबंध या प्रकल्पाशी किती आहे हे देखील शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. व सिडको सारखे साडे बारा टक्के प्लॉट व मोबदला आपल्याला शासन देणार असेल तर त्याचा आपण विचार नंतर करूया. मात्र सध्या आपली भूमिका ती माझी भूमिका असेल, मी एकदा शब्द दिला तर मागे हटत नाही हा इतिहास सर्वांना न्यात आहे.
शेतकऱ्यांनी गावागावात जाऊन बैठका घ्याव्यात व आपली एकजूट आणखी भकम करावी असे आवाहन जयंत पाटील यांनी या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना केले आहे. तर शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे आश्वासन बोरगाव बैठकीत दिले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते,तालुका चिटणीस श्रीराम राणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश फराट, खालापूर चे अध्यक्ष संतोष जंगम, पुंडलीक शिनारे, विभाग चिटणीस पांडुरंग बदे,सरपंच प्रमोद कोंडिलकर,माजी सरपंच कृष्णा बदे आदी उपस्थित होते.पोशीर धरण ज्या भागात होऊ शकते त्या बोरगाव,उंबरखांड,पेंढरी, भोपळेवाडी,चई चेवणे या गावातील शेतकतकरी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.