Khalapur : तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन केंद्राची मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडून पाहणी

चौक | अर्जुन कदम
खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीतील तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन केंद्रास रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी य जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
प्लास्टिक संकलन केंद्र  म्हणजे असाऊंड किंवा जागा जिथे टाकाऊ प्लास्टिक गोळा करून पुनर्वापरा कामी  पाठवले जाते. खालापूर तालुक्यात हे केंद्र कलोते ग्राम पंचायत हद्दीत होत.  घरातील किंवा परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर टाकाऊ वस्तू येथे जमा करण्यात येईलं प्लास्टिकच्या प्रकारानुसार (कडक, मऊ इ.) त्याची वर्गवारी करण्यात येणार आहे.गोळा केलेले प्लास्टिक रिसायकलिंग युनिट्सकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण कमी करणे व परिसर स्वच्छ करण्याचा उद्देश आहे. यावेळी प्रकल्प संचालक DRDA  प्रियदर्शनी मोरे,कार्यकारी अभियंता मोहन सरोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती शुभांगी नाखले, गटविकास अधिकारी संदिप कराड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड उपस्थित होते.
 मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी लास्टिक संकलन केंद्राची पाहणी करून प्लास्टिक संकलन, वर्गीकरण व व्यवस्थापनाच्या कामाबाबत संबंधितांना मार्गदर्शन केले. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करून ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा संतोष चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत शैलेंद्र तांडेल,विनोद चांदोरकर, कनिष्ठ अभियंता श्रीम.मयुरी खाडे, श्रीम.पूनम म्हात्रे ग्रामीण पाणीपुरवठा, प्रशासक अमित म्हसकर ग्रामपंचायत अधिकारी निलेश म्हसकर, समूह समन्वयक संदीप मोगारे, रविकिरण राठोड आदि ग्रामस्थ उपस्थित होते.