Karjat Heavy Rain : राहते घराचा अर्धा भाग कोसळल्यानं शेतकार्‍याचं मोठं नुकसान

Karjat kondivale home colaps
कर्जत (गणेश पवार) : 
कर्जत तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर येत असतानाच नेरळ जवळील दहिवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कोदिवले येथील शेतकरी अमर मिसळ यांचे मध्यरात्री घराचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.
सततधार पडणाऱ्या पावसामुळे घराला या आदी मोठे तडे गेले होते. या संदर्भात तलाठी यांनी गेलेल्या तड्यांची पाहणी देखील केली होती मात्र दि. २७ सप्टेंबर २०२५ च्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या कडेला असलेली जमीन धसल्याने घराचा किचन भाग मुख्य घरापासून वेगळा झाला आणि तो कोसळण्याच्या स्थितीत असलेला भिंतीचा भाग हा मध्यरात्री पडल्याने झालेल्या मोठ्या आवाजाने घरातील मंडळी जागी झाली. नागरिकांच्या वेळीच सतर्कतेमुळे घरातील वस्तू बाहेर काढण्यात आल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळला शिवाय सामानाची हानी होण्यापासून रोखण्यात आली.
 या घटनेनंतर शेतकरी मिसाळ कुटुंबाचे घर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे. अगोदरच तालुक्यात भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अमर मिसळ यांच्यावर घर कोसळल्याने संकटाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांचे शेतीचे झालेले नुकसान आणि मिसळ कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *