Job : पंजाब नॅशनल बँकेमध्ये १०२५ जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या अंतिम मुदत

Pnb Bank
PEN न्यूज ऑनलाइन टीम : बँकेत नोकरी करु इच्छुणार्‍या उमेदवारांसाठी पंजाब नॅशनल बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर या पदांकरिता एकूण १०२५ जागांवर भरती  सुरू होत आहे. जाणून घेऊया अधिक तपशील.
एकूण रिक्त पदे :- 
अधिकारी – क्रेडिट – एकूण रिक्त पदांची संख्या १०००
व्यवस्थापक – फॉरेक्स – एकूण रिक्त पदांची संख्या १५
व्यवस्थापक – सायबर सुरक्षा – एकूण रिक्त पदे ५
वरिष्ठ व्यवस्थापक – सायबर सुरक्षा – एकूण रिक्त पदे ५
 अधिसूचना:-
https://www.pnbindia.in/Recruitments.aspx
वय :-
१ जानेवारी २०२४ पर्यन्त कमीत कमी २१ वर्ष तर जास्तीत जास्त २८ वर्षा पर्यन्त असावे
 निवड प्रक्रिया :- 
या पदांवर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल किंवा केवळ वैयक्तिक मुलाखतीवर उमेदवाराची निवड केली जाऊ शकते. ही प्रक्रिया प्रत्येक जागेवर येणाऱ्या अर्जांवर अवलंबून राहील. ऑनलाइन लेखी परीक्षा घेतल्यास ती एकूण १०० मार्कांची असेल; तर वैयक्तिक मुलाखत ही ५० मार्कांची असेल.
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :-
७ ते २५ फेब्रुवारी असणार आहे.
 अर्ज करण्यासाठी शुल्क :- 
एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी [SC/ST/PwBD] या श्रेणीतील उमेदवारांना ५० रुपये + GST १८% = ५९ रुपये, असे शुल्क भरावे लागेल.
इतर श्रेणींतील उमेदवारांना १००० रुपये + GST १८% = ११८० रुपये इतके शुल्क भरावे लागेल.
अर्ज शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस किंवा कोणतेही यूपीआय यांसारख्या गोष्टींचा वापर करू शकता.
उमेदवारांना नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करण्याबाबत अधिक माहितीसाठी हवी असल्यास पंजाब नॅशनल बँकेच्या pnbindia.in. या वेबसाईटवर जावे

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *