Alibag : वरसोलीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत

Alibag : वरसोलीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
पर्यटनप्रेमी अलिबाग शहरालगत असलेल्या वरसोली येथील लोटस कॉटेज या गेस्टहाऊसमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी तडके पहाटे छापा टाकून एक महिला आणि एक पुरुष आरोपीला अटक केली असून, पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिची सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला (वय ५०, रा. पश्चिम बंगाल) आणि राजेश रामलखन चौपल (वय २५, रा. घरभंगा) हे लोटस कॉटेजचा कुंटणखाना म्हणून वापर करीत होते. पीडित महिलेला वेश्या व्यवसायात उतरवून, पर्यटकांमध्ये वेश्याव्यवसायासाठी गिऱ्हाईक पुरवण्याचे काम आरोपी करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून २५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अलिबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *