
उरण | विठ्ठल ममताबादे
देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या धुतूम गाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बुधवारी (ता. २४) स्मिता नंदकुमार ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “निवडणूक लढताना दिलेली आश्वासने पूर्ण करा. पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे, मात्र तो शंभर टक्के सुटला पाहिजे. मैदान व समाजमंदिराचे प्रश्नही लवकरच मार्गी लागतील. महिला लढावू आहेत, त्यांना संधी मिळालीच पाहिजे. धुतूम ग्रामपंचायत व सर्व पदाधिकारी उत्तम काम करत असून त्या सर्वांचे अभिनंदन.”
कार्यक्रमाला सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महेंद्रशेठ घरत तसेच सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी धुतूमचे माजी सरपंच शंकर ठाकूर, उद्योजक पी. जी. शेठ ठाकूर, काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, मिलिंद पाडगावकर, अखलाख शिलोत्री यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related