कोलाड | श्याम लोखंडे
स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांचा १६ वा वर्धापन दिन सोमवार दि.३ ऑगस्ट २०२६ रोजी राजेश्री वसंत महाबळे यांच्या वसाहत टेरेसवर मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या शुभेहस्ते गणेश पूजन करून ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी डॉ. दर्शना बसरे प्राथमिक आरोग्यकेंद्र आंबेवाडी, प्रितमताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका महिला अध्यक्षा,जेष्ठ नागरिक अध्यक्ष दगडू बामुगडे, अनंतराव म्हसकर, नारायण धनवी,मारुती राऊत,नंदकुमार पवार,व असंख्य नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमा निमित्ताने सामाजिक वन्य जिव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर दहिंबेकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिव्हरसिटी लोणेरे येथील इलेक्ट्रॉनिक डिप्लोमामध्ये आलेल्या सुकन्या निलेश महाबळे ९९.३० टक्के गुण प्रथम, चंदना महेश म्हसकर द्वितीय तर कॉप्युटर इजिरिंग मध्ये ९६.७० टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या जान्हवी प्रशांत बामुगडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या २७ जेष्ठ नागरिकांना आधार काठी तसेच विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन सभासद यांचा ही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर व नंदकुमार पवार यांचे विशेष सहकार्य लाभले असुन सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी अध्यक्ष दगडू बामुगडे,सचिव अशोक कदम, सहसचिव सहदेव कापसे,खजिनदार केशव महाबळे, हिशोब तपासणीस नंदकुमार पवार,संचालक प्रविण गांधी, पांडुरंग सानप, भरत सातांबेकर, बळीराम ठोंबरे, विठोबा गोरीवले, माऊली वाळंज,तुकाराम सानप, देविदास सानप,अशोक लहाने,व सर्व सदस्य यांनी अपार मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण गांधी तसेच सूत्रसंचालन सहदेव कापसे यांनी केले.
