दिल्ली पोलिसांमध्ये हेड काँस्टेबल (मिनिस्ट्रीयल) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) तर्फे डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ मध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE) घेण्यात येणार आहे. या भरतीतून एकूण ५०९ पदे (पुरुष – ३४१, महिला – १६८) भरली जाणार आहेत.
महत्त्वाच्या बाबी :
पदसंख्या: ५०९ (पुरुष – ३४१, महिला – १६८)
वयोमर्यादा (१ जुलै २०२५ रोजी): १८ ते २५ वर्षे (शासकीय नियमांनुसार सवलत लागू)
पात्रता: १२वी उत्तीर्ण व टायपिंग स्पीड (इंग्रजी – ३० श.प्र.मि. / हिंदी – २५ श.प्र.मि.)
वेतन श्रेणी: पे-लेव्हल ४, अंदाजे वेतन ₹५२,०००/- प्रति महिना
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२५ (रात्रौ ११ वाजेपर्यंत)
निवड प्रक्रिया: 1️⃣ संगणक आधारित परीक्षा (CBE) – १०० गुण, ९० मिनिटे 2️⃣ शारीरिक क्षमता व मापदंड चाचणी (PE/MT) 3️⃣ टायपिंग टेस्ट (२५ गुण, वेळ १० मिनिटे) 4️⃣ कॉम्प्युटर फॉरमॅटिंग टेस्ट (MS Word, PowerPoint, Excel – पात्रता स्वरूपाची) 5️⃣ वैद्यकीय तपासणी
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.
अतिरिक्त गुण:
NCC ‘C’ सर्टिफिकेट – ५ गुण
NCC ‘B’ सर्टिफिकेट – ३ गुण
NCC ‘A’ सर्टिफिकेट – २ गुण
राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ पदवीधरांना अतिरिक्त २ ते ५ गुण
परीक्षा केंद्रे (महाराष्ट्रात): मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, औरंगाबाद (छ. संभाजी नगर), जळगाव, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, पणजी
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर २०२५
करेक्शन विंडो: २७ ते २९ ऑक्टोबर २०२५
परीक्षा: डिसेंबर २०२५ / जानेवारी २०२६ (तारीख लवकरच जाहीर होईल)