सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरतीसाठी दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहिरात व दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी शुध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
मात्र, सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणांमुळे दि. २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रीय झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना अर्जासाठी आवश्यक वेबलिंकपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा सैनिक कार्यालयाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी
या वेब लिंकचा तसेच QR कोडचा वापर करून दि. ०९ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाने केले आहे.