सिध्देश्वर (खुर्द) येथिल नाना दंत यांचे निधन

Nana Dant
सुकेळी ( दिनेश ठमके) : सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर (खुर्द) येथिल नाना सखाराम दंत यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी सोमवार दि.१५ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. कै. दंत यांच्यावर सोमवारी रात्री ११ वाजता सिध्देश्वर येथिल वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते.
कै. दंत यांनी आपले अर्धे आयुष्य हे शेती व्यवसाय करण्यात घालवले तर बाकी‌ आयुष्य हे पालीमध्ये काही हाॅटेलमध्ये एक चांगळ्या प्रकारे कारागीर म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करण्यात घालवले. स्वभावाने अंत्यत शांत, प्रेमळ व मनमिळावूपणा ही नानांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी , विवाहित मुलगी, भाऊ राजेंद्र दंत, पुतणे , नातवंडे, त्याचप्रमाणे मोठा दंत परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.२४ रोजी तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि.२६ जाने. रोजी होणार असल्याचे दंत कुटुंबियांच्या वतीने सुरेश दंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *