सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी (GNM Course) महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी (GNM Course) महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर.एन. कूपर रुग्णालय, जुहू यांच्या वतीने ३ वर्ष कालावधीच्या सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी (GNM) महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम दि. १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत २७ जुलै २०२५ (१६:०० वा.) पर्यंत आहे.
प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना BMC अंतर्गत विविध रुग्णालयांमध्ये निवासी पद्धतीने मोफत वसतीगृह आणि भोजनासह प्रशिक्षण दिले जाईल.
उपलब्ध जागा: एकूण ३५०, त्यातील ५% जागा ANM (Auxiliary Nurse Midwife) धारक महिला उमेदवारांसाठी राखीव.
 पात्रता:
  • १२ वी उत्तीर्ण (PCB विषयांसह – किमान ४०% गुण)
  • इतर प्रवर्गासाठी गुण मर्यादा: ३५%
  • मराठी विषयात किमान ५० गुण आवश्यक
  • वयोमर्यादा: १ ऑगस्ट १९९० ते ३१ जुलै २००८ दरम्यान जन्म झालेला असावा (१७ ते ३५ वर्षे)
 प्रशिक्षण रुग्णालये:
  1. रा.ए. स्मारक रुग्णालय, परळ
  2. नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल
  3. सायन हॉस्पिटल
  4. डॉ. आर.एन. कूपर हॉस्पिटल, विलेपार्ले
  5. भगवती हॉस्पिटल, बोरिवली
 आवश्यक कागदपत्रे:
  • १०वी, १२वी गुणपत्रके
  • मराठी विषयाचे गुण
  • जात प्रमाणपत्र व जात वैधता (लागू असल्यास)
  • Non-Creamy Layer/EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ऑनलाइन अर्जाची प्रत आणि शुल्काची पावती
 शुल्क:
  • खुला वर्ग: ₹727 (GST सहित)
  • मागासवर्गीय: ₹485 (GST सहित)
 महत्त्वाच्या तारखा:
  • अर्ज सुरू: १६ जुलै २०२५
  • अर्ज अंतिम तारीख: २७ जुलै २०२५ (१६:०० वा.)
  • समुपदेशन यादी: ३१ जुलै २०२५
  • समुपदेशन सत्र: ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२५
  • गुणवत्तानुसार अंतिम यादी: १२ ऑगस्ट २०२५
  • प्रवेश अंतिम तारीख: १८ ऑगस्ट २०२५
 अर्ज लिंक:
https://portal.mcgm.gov.in

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *