रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असतानाच व या नियुक्तीला लागली स्थगिती दिली असताना पुन्हा एकदा रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील महायुती सरकारने १८जानेवारी रोजी राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती या यादीवरून महायुती सरकार मधील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वाद झाला या वादाची ठिणगी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पडली शिंदे गटातील रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्त झालेल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला विरोध केला व१९ जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास गोगावले समर्थकांनी आदिती तटकरे यांच्या व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळील नडगाव येथे रास्ता रोको करून टायर जाळून महामार्ग तब्बल दोन तास रोखला व दुसऱ्या दिवशी शिंदे गटाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सूत्र चालू केले.
अखेर या वादामुळे राज्य शासनाने रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्ती तात्पुरती स्थगिती देणारा अध्यादेश काढला रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद नियुक्ती द्वारे स्थगिती दिल्यानंतर २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी रायगड येथे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे व नाशिक येथे गिरीश महाजन हे राष्ट्र ध्वजारोहण करतील अशा आशयाचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने राज्याचे अप्पर सचिव सुनील सोनार यांच्या आदेशान्वये २० जानेवारी रोजी काढले आहे.
रायगड व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असताना व त्याला स्थगिती आदेश दिले असताना पुन्हा एकदा त्याच मंत्र्यांना ध्वजारोहण करण्यास अनुमती देणारा अध्यादेश राज्य सरकारने जारी केल्याने राज्य सरकारमध्ये सर्व काही अलबेला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे