कर्जत ( गणेश पवार ) : कशेळे येथील कै.लक्ष्मीचंद दामोदर गोर यांनी सुमारे वीस वर्षापूर्वी जमीन खरेदी केली होती. त्यांनी सदर जामीन मोठ्या मुलाचे नावे करून दोन्ही मुलानी ती समान वाटून घ्यावी असे सुचविले होते. वडिलांचा 2006 साली मृत्यू झाला त्या नंतर मोठ्या मुलाने आईला कधीच सांभाळले नाही. परंतु वडिलांनी घेऊन दिलेल्या जमिनी पैकी अर्धा वाटा लहान भावास देण्यास तयार असल्याचे वारंवार सांगितले.
प्रत्यक्ष वाटा देण्या वेळी पत्नीने धमकावल्या मुळे आता तो वाटा देण्यास तयार नाही लहान मुलावर होणाऱ्या अन्यायच्या विरोधात 75 वर्षीय चंद्रकांता गोर या गुरुवार दिनांक 4 जानेवारी पासून उपोषण करणार आहेत. कशेळे ग्रामस्थांना सर्व वस्तुस्थिती माहिती असल्याने त्यांनी मुलगा वीरेंद्र यास भावाचा हिस्सा द्यावा अशी विनंती केली. परंतु भावाची पत्नी याला विरोध करीत आहे.
चंद्रकांता लक्ष्मीचंद गोर यांना हेवी डायबेटिस, ब्लड प्रेशर आणि अनेक आजार आहेत. एक दिवसाचे उपोषण सुद्धा त्यांच्या जीवावर बेतू शकते. या करिता तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने उपोषणा पूर्वी मार्ग काढावा अशी कशेळे ग्रामस्थांची विनंती आहे.