संघर्षातून यशाकडे: सचिन इंगळे यांचा प्राथमिक शिक्षक, पोलिस अधिकारी ते अप्पर सचिव पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

Sachin ingale
पनवेल (संजय कदम) :
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण तळेगाव ढमढेरे तर गुजर प्रशालेत बारावीचे शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरुर येथे करून अत्यंत नाजूक परिस्थितीत सुद्धा शिक्षण पूर्ण करून डी.एड पात्रता मिळवून प्रथम शिक्षक नंतर पोलीस खाते व त्यानंतर स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यसेवेतून मंत्रालयात कक्ष अधिकारी(2016) या पदावर निवड झाली. त्यानंतर नुकतीच मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर सचिव पदावर पदोन्नती झाल्याने सचिन रंगनाथ इंगळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सचिन रंगनाथ इंगळे, तळेगाव ढमढेरे ता- शिरूर जि. पुणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण तळेगाव ढमढेरे, गुजर प्रशालेत तर बारावीपर्यंत शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरूर ,या ठिकाणी पूर्ण केले.अत्यंत नाजूक परिस्थिती असल्यामुळे डी,एड शैक्षणिक पात्रता मिळवून  शिक्षण सेवक म्हणून खेड  तालुक्यातील कारकुडी या छोट्याशा गावात प्राथमिक शिक्षक पदावर रूजू झाले. ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना अभ्यासात खंड पडू दिला नाही. बी.ए नंतर पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलिस उपनिरीक्षक ( 2011 ) पदावर निवड झाली.
नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून गडचिरोली जिल्ह्यातील बामणी पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त भागात साहेबांनी सामुदायिक विवाह सोहळा व अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली पनवेल, तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला झाली.हे सर्व करत असतांना त्यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास चालूच होता . त्यातून त्यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यसेवेतून मंत्रालयात कक्ष अधिकारी(2016) या पदावर निवड झाली.
सार्वजनिक बांधकाम विभागात अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने काम करून नुकतीच मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अव्वर सचिव पदावर पदोन्नती मिळाली.परीस्थितीची जाणिव व आपण समाजाचे  काहीतरी देणे लागतो या भावनेतून आजही सर्व सामान्य लोकांसाठी साहेब नेहमीच मदत करतात. साधी रहाणी व उच्च विचार असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *