नागोठणे ( महेंद्र माने ) : रोहा तालुक्यातील वेलशेत गावचे सुप्रसिद्ध शाहीर प्रभाकर डुंगाजी पारंगे यांचे वयाच्या 61 व्या वर्षी रविवार 04 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
शाहीर प्रभाकर हे कोकणच्या संस्कृतीचा मानाच्या शक्ती तुरा (बाळ्या डान्स) नृत्य प्रकारातील एक सुप्रसिद्ध पहाडी आवाजाचे गायक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या आवाजाची गाणी कॅसेटच्या माध्यमातून गौरी गणपतीच्या सणाला संपूर्ण रायगड जिल्ह्यात घराघरांतून वाजताना दिसत असल्याने त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्यांची कीर्ती अजरामर राहणार असून त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 4.00 वाजता वेलशेत स्मशानभूमीत अंत्यसंकार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिमा पारंगे, निशांत आणि हिमालय ही दोन मुले, एक विवाहित कन्या तसेच सूना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार 13 फेब्रुवारी वेलशेत अंबानदी घाट तर उत्तरकार्य शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती पारंगे कुटुंबियांनी दिली.