विन्हेरे वन विभाग झोपेत? पांगारीत पुन्हा सागवानीची कत्तल; ठेकेदारांना अभय, जंगलाचा बळी!

महाड | प्रतिनिधी
महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील नागाव खिंडीमध्ये ज्याप्रमाणे सागवानी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड झाली त्याच पद्धतीने पांगरी गावातील रोहिदास वाडी परिसरात देखील बेकायदेशीर रित्या सागवानी वृक्षांची तोड केल्याचे उघड होत असताना वन खात्याचे अधिकारी कारवाई कुणावर व कधी करणार? असा सवाल पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे
याबाबत अधिक माहिती अशी की महाड तालुक्यातील विन्हेरे विभागात असणाऱ्या नागाव खिंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर सागवानी वृक्षांची बेकायदेशीर रित्या जंगलतोड केल्याचे प्रकरण उघड झाले असताना त्याच पद्धतीने नागाव खिंडीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पांगारी रोहिदासवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवानी वृक्षांची बेकादेशीर रित्या जंगलतोड केल्याचे प्रकरण उघड होत आहे
विन्हेरे विभागात असणाऱ्या नागाव खिंडीतील बेकायदेशीर रित्या सागवानी वृक्षाची जंगलतोड प्रकरणात जर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती तर पुढील बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना आळा बसला असता मात्र नागाव खिंडी मधील सागवानी वृक्षाची जंगलतोड करणाऱ्या ठेकेदाराला किती सागवानी वृक्षांची तोड करण्याची परवाना देण्यात आला होता जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सागवानी वृक्षांची तोड करण्याचा परवाना दिला आहे तर संबंधित शेतकऱ्याच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सागवानी लाकूड एकाच ठिकाणी उपलब्ध आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे!
जर एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सागवानी महाकाय वृक्षांची तोड झाली असेल तर एका सातबारावर एवढी झाडे नोंद असल्याचे महसूल व वन विभागाच्या दरबारी तरी आहे का ? जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर सागवानी वृक्षांची तोड करण्यात आली आहे तर शेतकरी मालामाल होण्याऐवजी ठेकेदार व वनखात्याचे अधिकारीच मालामाल होत असल्याचे यामुळे निष्पन्न होत आहे तसेच पांगरीरोहिदास वाडी परिसरात याच पद्धतीने सागवानी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकादेशीर त्या वृक्षतोड झाली आहे ही सागवानी वृक्ष एका शेतकऱ्याच्या सातबारावर आहेत का ?असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित होत आहे वन खात्याच्या वनक्षेत्र पालापासून, वनपाल ते वनरक्षक यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण जंगलतोडीची परवानगी दिली आहे. यामुळे पर्यावरण संतुलन ढासळत चालले आहे
याबाबतची दखल का घेतली नाही तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीची परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची पाहणी न करतात संबंधित ठेकेदाराला तोडलेल्या वृक्षांची वाहतूक इतरत्र करण्यासाठी ज्या पद्धतीने पास दिला जातो त्यावेळेला खरोखरच गाडीमध्ये भरण्यात येत असलेला मुद्देमाल हा तोच आहे की पासावर दाखवण्यात येत असलेल्या लाकडांव्यतिरिक्त इतर लाकूड वाहतूक करण्याचे काम ठेकेदार करीत आहे का? याबाबतची शहानिशा कोण करणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे एकंदरीत कारवाई कोणी कोणावर करायची हा प्रश्न आता वन खात्याच्या अधिकाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.