वडखळ नाक्यावर भरधाव टँकरच्या धडकेत इसम गंभीर जखमी

PEN न्यूज ऑनलाइन टीम |
पेण तालुक्यातील वडखळ नाका येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत एका मजुराला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील राम किशोर (वय ३२), व्यवसाय मजुरी, सध्या रा. उदयम कॉलनी, वडखळ, अलिबाग रोड, ता. पेण, जि. रायगड हे वडखळ नाका येथील पेट्रोलपंपातून वडखळ बाजारपेठेकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी अलिबागकडून डोलवीकडे जाणारा टँकर क्रमांक एमएच ०४ सीपी ०४४२ वरील चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. 
या अपघातात सुनील किशोर यांच्या उजव्या पायाच्या मांडीवरून टँकरचे चाक गेल्याने गंभीर दुखापत झाली. तसेच दोन्ही पाय व चेहऱ्यावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपेश कोंडे करीत आहेत.