लाडक्या बहि‍णींना हप्ता कधी आणि किती मिळणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

Aditi Tatkare
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये दिले जातात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने जाहीर केले होते की, जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं, तर १५०० रुपयांच्या ऐवजी महिलांना २१०० रुपये देण्यात येतील. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने पुन्हा सत्ता घेतली, परंतु अद्याप लाडकी बहीण योजनेतील निधीमध्ये वाढ केली गेली नाही.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, “आम्ही याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्याही तोंडी याबाबत स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. नवीन अर्थसंकल्प मांडल्यानंतरच २१०० रुपयांच्या निधीबाबत विचार केला जाईल. तोपर्यंत महिलांना १५०० रुपयांचाच लाभ दिला जाईल.”
आदिती तटकरे यांनी सांगितलं की, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हप्ता २५ ते ३० डिसेंबर दरम्यान वितरित करण्यात आला होता, आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीच्या आधी महिलांना वितरित करण्यात येईल.
त्यामुळे, २१०० रुपयांच्या वाढीव हप्त्याबाबत निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *