रिक्षा चालक बेपत्ता !

Nishad
पनवेल ( संजय कदम ) : पळस्पेफाटा येथे राहणार एक रिक्षा चालक घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला असून तो अद्याप घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
निषाद जमात अली पठाण (वय ४५ वर्षे) असे या इसमाचे नाव असून त्याचा रंग सावळा, उंची ५.६ फुट, डोक्याचे सफेद व वाढलेले, डोळ काळे, नाक सरळ, चेहरा उभट, शरीराने मध्यम असून त्याने अंगात निळया व काळया रंगाचा पटया असलेला फुलबाहयाचा शर्ट, काळया रंगाचा पॅन्ट घातली आहे. तसेच पायात सफेद रंगाची चप्पल डोळयावर चष्मा आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिका माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार सतीश जवरे यांच्याशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *