राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी ‘सूनेत्रा पवार’ यांची निवड; शनिवारी शपथविधीची शक्यता

#राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी 'सूनेत्रा पवार' यांची निवड
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सूनेत्रा पवार यांची शनिवारी निवड केली जाणार आहे. त्यासाठी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडीनंतर लगेचच त्यांचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात तातडीने समावेश केला जाणार असून, शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन या निर्णयाची माहिती दिली आहे.
शनिवारी दुपारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर निवडीचे अधिकृत पत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार सूनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडेल. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *