रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात; प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले, काही घरांचं नुकसान, एकाचा मृत्यू !

Poor
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार अनेक नद्या इशारा पातळीखाली वाहत असून, कुंडलिका नदी मात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.
बहुतेक भागांतील पाणी ओसरल्यामुळे प्रमुख रस्ते व पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून शासकीय यंत्रणा सतत कार्यरत आहेत.
रस्ते व वाहतूक स्थिती:
  • तळा तालुका: संगम पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू.
  • महाड:
    • सुरेश गणपत भोसले (५८) यांचा पाय घसरून मृत्यू.
    • सावित्री नदीचं पाणी ओसरल्याने रावल पूल, मल्लिकार्जुन मंदिराजवळील पूल, दस्तुरी मार्ग, सांडोशी-सावर रस्ता वाहतुकीस खुला.
  • रोहा:
    • भिसेखिंड, रोहा-भालगाव मार्गावर अडथळे हटविले.
    • वरसे भुवनेश्वर, आंबेवाडी, चिकणी, शिरवली परिसरातील पाणी ओसरले.
    • काही घरांना पाणी व अंशतः नुकसान; पंचनामे सुरू.
  • पोलादपूर:
    • आंबेनळी घाट दि. १५ ऑगस्टपर्यंत बंद.
    • गवळी गावाजवळ माती घसरली; जिवीतहानी नाही.
  • अलिबाग: रामराज पूल व बाजारपेठेतील पाणी ओसरले.
  • म्हसळा: ढोरजे देवे नदीपुलावरील पाणी ओसरले; वाहतूक सुरळीत.
  • पाली – सुधागड: वावळोली येथील घराचे नुकसान.
  • श्रीवर्धन: रानवलीता येथे एक कच्चं घर पडलं.
  प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवले असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि अधिकृत सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *