पतन विभाग अंतर्गत केलेल्या कामाचा गुणवत्ता अहवाल प्राप्त करण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना दोन खासगी महिला ह्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या कारवाईत समोर आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यात श्रेयस नंदकुमार म्हात्रे यांची स्वतःच्या नावाची शासन नोंदणीकृत संस्था असून यातील तक्रारदार यांच्या परिचयाचे आहेत तक्रारदार हे सुद्धा उप ठेकेदार म्हणून काम करतात. तक्रारदार यांचे परिचयाचे ठेकेदार श्रेयस नंदकुमार म्हात्रे यांनी दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाचे पतन अभियंता, पतन अभियांत्रीकी विभाग कोकाण भवन नवी मुंबई यांच्या मार्फतीने रायगड जिल्ह्यात असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापुर या ठिकाणी खाडील लगत पक्टी रॅम्प बांधण्याचे कंत्राट मिळाले होते.
धाकटे शहापुर या ठिकाणी खाडील लगत पक्टी रॅम्प बांधण्याचे वेळेत पूर्ण करावयाचे असल्याने त्याबाबत उप ठेकेदार असलेले तक्रारदार यांना कायदेशीर प्रक्रिया व इतर कामकाज करण्याचे अधिकार पत्र दिले होते. त्यानुसार तकारदार यांनी काम सुरू केले होते. काम चालु झाल्यानंतर बांधकामाकरीता वापरण्यात येणारे साहीत्या यांची तपासणी करून तसा अहवाल रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे असणाऱ्या सहायक संशोधक अधिकारी दक्षता व गुणनियंत्रण जिल्हा प्रयोगशाळा यांच्याकडुन प्राप्त करून घेणे आवश्यक असते.त्यानुसार उप ठेकेदार तक्रारदार यांनी सदरचा अहवाल प्राप्त करण्याकरीता शासकीय शुल्क अठरा हजार रूपये ती ऑनलाईन पध्दतीने भरली होती.
शासकीय शुल्क भरल्यानंतर उप ठेकेदार तक्रारदार यांनी सहायक संशोधक अधिकारी दक्षता व गुणनियंत्रण जिल्हा प्रयोगशाळा कार्यालयात अहवाल प्राप्ती संदर्भात संपर्क केला केला असता त्या कार्यालयात कार्यरत असणारी महीला सोनल संतोष नाडकर, वय-२८ वर्षे मु कोशिबळे, पो. निजामपुर, ता. माणगाव, जि. रायगड (खासगी महिला) यांनी अहवाल देण्याकरीता शासकीय शुल्क व्यतीरिक्त अजुन अठरा हजार स्वतासाठी व साहेबांसाठी मागणी केल्याची तक्रार दिनांक ०४सप्टेंबर २०२५ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड अलिबाग यांच्याकडे केली होती. उप ठेकेदार तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या या अनुषंगाने दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये खासगी महिला सोनल संतोष नाडकर, संजना सुरज धाडवे,यांनी दक्षता गुण नियंत्रण (सार्वजनिक बांधकाम विभाग) जिल्हा प्रयोग शाळा येथे उप ठेकेदार तक्रारदार यांचेकडे अठरा रूपये लाचेची मागणी करून, तडजोडीअंती पंधरा हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानुसार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी रोजी दक्षता गुण नियंत्रण (सा.बा.वि) जिल्हा प्रयोग शाळा परिसरात रायगड जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण सरोदे, निशांत धनवडे, सहाय्यक फौजदार हेमंत करकरे,विनोद जाधव, महिला सहाय्यक फौजदार सुषमा राउळ , पोलिस हवालदार महेश पाटील,परम ठाकुर,सुमित पाटील,सचिन आटपाडकर चालक पोलिस हवालदार सागर पाटील, वाकोजी कोलंमकर , महिला पोलिस शिपाई मोनाली पाटील,मोनिका मोरे आदीच्या पथकाने सापळा आयोजित करण्यात आला.
खासगी महिला सोनल संतोष नाडकर यांनी उप ठेकेदार तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याप्रमाणे पंधरा हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारत असताना सोनल संतोष नाडकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तर संजना सुरज धाडवे, हिने सदर लाच मागणी व स्विकारण्याकरीता प्रोत्साहन दिल्याने त्यांना सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे . या दोघांविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग यांनी दिली आहे.