मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षेचा बोजवारा; अनधिकृतपणे काढलेल्या क्रॅश बॅरिअरमुळे भीषण अपघात, नशीब बलवत्तर म्हणून चालक थोडक्यात बचावला

महाड | मिलिंद माने 
मुंबई व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हलगर्जीपणामुळे नियमबाह्य पद्धतीने खाजगी व्यावसायिकांकडून रस्त्यावरील क्रश बॅरिअर अनधिकृत पणे तोडून टाकण्याच्या हुकूमशाही पद्धतीमुळे एक टेम्पो चालक बॅरियरला धडकून क्रॅश बॅरिअर वाहनाच्या पुढील बाजूस कडून घुसून पाठीमागील बाजूकडे निघाला मात्र “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीप्रमाणे नशीब बलवत्तर म्हणून टेम्पो चालकाचा मृत्यू टळला परंतु अनधिकृत पणे क्रॅश बॅरिअर तोडणाऱ्या व्यावसायिकांविरोधात राष्ट्रीय महामार्ग विभाग एखाद्या मोठ्या अपघातात जीवित हानी झाल्यानंतरच डोळे उघडणार का असा सवाल वाहन चालक राष्ट्रीय महामार्ग विभागास विचारत आहेत.
पावसाळ्याचा हंगाम चालू झाल्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर कशेडी घाटापासून महाड, माणगाव ,इंदापूर ,कोलाड ,नागोठणे ,पेण व पनवेल पर्यंतच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणामुळे अपघाताची मालिका चालू झाली आहे. अद्याप पर्यंत झालेले अपघात किरकोळ स्वरूपाचे असले तरी यातून जीवित आणि टळली आहे मात्र पुढील पावसाळ्याचा हंगाम पाहता राष्ट्रीय महामार्ग विभाग डोळे उघडून जागे होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड जवळील केभुर्ली या ठिकाणी चालत्या ईरटीका कारवर दगड कोसळला मात्र जीवित हानी टळली त्याच पद्धतीने त्याच रात्री सुकेळी खिंडीत अवघड वळणावर ट्रेलर चालकाला वाहनाचा वेग नियंत्रणात आणण्यास अपयश आल्याने एक ट्रेलर दुसऱ्या टेलर वर जाऊन धडकला या ठिकाणी देखील मात्र जीवित हानी झाली नाही, मात्र पुन्हा एकदा महाड जवळील वहूर गावच्या हद्दीत२४. जूनच्या मध्यरात्री महाड कडून मुंबई बाजूस जाणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीचा एमएच. ४७ . ए .एस.३८२९ या टेम्पोच्यालाकाला रस्ता व्यवस्थित न दिसल्याने रस्त्याच्या बाजूला एका खाजगी व्यावसायिकाने रस्त्यावर असणारे क्रॅश बॅरियर अर्धवट अवस्थेत काढून टाकल्याने सदरचा टेम्पो क्रॅश बॅरियर ला जाऊन धडकला ही धडक एवढी गंभीर होती की क्रॅश बॅरियर पुढील इंजिन बाजू कडून निघून पाठीमागील बाजूस मालवाहतूक असणाऱ्या जागेतून आरपार निघाला केवळ दैव- बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवसात दुसरा अपघात दासगाव गावाजवळ झाला मुंबई कडून रत्नागिरी कडे जाणाऱ्या के .ए.झेड.यू.७९९७ या मालवाहू ट्रक रस्त्या फोडून डिवाइडेड ला जाऊन धडकला मात्र सुदैवाने या ठिकाणी देखील जीवित हानी टळली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटापासून मुंबई बाजूस जाणाऱ्या व पनवेल कडून कशेडी घाटापर्यंत जाणाऱ्या दोन्ही बाजूकडील रस्त्यांवर धोकादायक वळणे व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत पणे काढून टाकले आहेत व त्या ठिकाणाहून अनाधिकृतपणे वाहन आत मधी येणे व वाहन बाहेर जाणे या करिता अनधिकृत पणे काढलेल्या क्रॅश बॅरिअरचा वापर केला असल्याने अनेक वाहन चालकांना महामार्गावरून वाहन चालवीत असताना वाहतुकीला अडथळा होत आहे व अपघात घडण्याची शक्यता असताना देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी झोपी गेले आहेत का? असा सवाल या वहूर येथील असणाऱ्या क्रॅश बॅरिअरला धडकून झालेल्या अपघातावरून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी किती जागरूक आहेत याचे उत्तम उदाहरण पाहण्यास मिळत आहे.
क्रॅश बॅरियर ला देखील काळे पांढरे पट्टे का नाहीत?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना दिसत नाहीत ते दिसावेत यासाठी काळे व पांढरे पट्टे क्रॅश बॅरिअरला मारणे आवश्यक आहे, मात्र काळे पांढरे पट्टे न मारल्याने वाहन चालकांना महामार्गाची रस्त्याच्या साईड पट्टीवरील बाजूस दिसत नसल्याने एखादा मोठा अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.