
पोलादपूर (शैलेश पालकर) :
कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘स्थानिक तक्रार समिती’ गठण अहवाल प्रत देण्याबाबत तसेच समिती सदस्य पदी पोलादपूर येथील पब्लिक नोटरी व ज्येष्ठ वकील माधवी धारिया यांची निवड झाल्याचे अधिकृत शासकीय पत्र रायगड जिल्हाधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून त्यांना प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ व नियम दि. ०९/१२/२०१३ नुसार विशाखा जजमेंट मधील तरतुदीनुसार कलम ६(१) अंतर्गत जिल्हा स्तरावर ‘स्थानिक तक्रार समिती’ जिल्हाधिकारी महोदय रायगड-अलिबाग यांच्या आदेशानुसार सदर समितीचे अध्यक्ष म्हणुन डॉ. निहा अनीस राऊत यांची निवड करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदीप्रमाणे एडव्होकेट माधवी धारिया यांनी सदस्य पदावरून कामकाज करण्यासाठी ही नियुक्ती महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार करण्यात आली आहे.
Related