महाडजवळ भीषण अपघात: आयशर टेम्पो व रिक्षाची समोरासमोर धडक – १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, आठ जण गंभीर जखमी

Terrible accident near Mahad: Eicher tempo and rickshaw collide head-on – 13-year-old boy dies, eight people seriously injured
महाड( मिलिंद माने) :
अवकाळी पावसाचा फटका राज्य मार्गावर झालेल्या चिखलामुळे आयशर टेम्पो व विक्रम रिक्षा अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर रित्या जखमी झाले असून या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाड येथून विन्हेरे गावाकडे M H. ०६ s ३६२५ या विक्रम रिक्षाचा चालक सुधीर गीजे हा ४ वाढण्याच्या सुमारास बिज घर गावाजवळ दापोली कडून मुंबईकडे येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे उतारा मध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट समोरून येणाऱ्या विक्रम मिनी डोर रिक्षाला समोर धडकल्याने रिक्षा बाजूच्या गटारात जाऊन उभी राहिली आयशर टेम्पो चालकाने मिनी डोअर रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेमध्ये या रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मंथन रवींद्र भिलारे हा तेरा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य जन गंभीर जखमी झाले.
मिनी डोअर रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे ;
१) राजेंद्र सखाराम भिलारे राहणार शिरवली वय वर्ष ३५
२) अर्चना रुपेश धोत्रे राहणार महाड वय वर्ष २७
३) रियांश अभिषेक रेडीज वय वर्ष ७ राहणार मुंबई दहिसर
४) श्रद्धा श्रीकांत मापुसकर राहणार विन्हेरे वय वर्ष ६0
५) सुधीर गंगाराम गीजे राहणार विन्हेरे वय वर्ष 39
६) श्रीकांत विठोबा मापुस्कर वय वर्ष ६५ राहणार विन्हेरे
७) श्रेयशी अभिषेक रेडीज राहणार विन्हेरे वय वर्ष ३७
८) मंथन रवींद्र भिलारे वय वर्ष १३ हा या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत पावला
या अपघातानंतर टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेला आहे याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *