शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर, श्रीवर्धन मतदारसंघातील मौजे भोस्ते, बापवन, मारळ, चिखलप व बोर्ले या गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम प्रथमच पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यास राज्यसभा खासदार व दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, तसेच श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, तळा तालुका अध्यक्ष रितेश मुंडे, माणगाव तालुका अध्यक्ष परेश सांगळे, म्हसळा तालुका अध्यक्ष महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी काही पक्ष प्रवेश सुद्धा पार पडले. श्रीवर्धन तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.