भर पावसात कर्जत शहरात तिरंगा रॅलीचा जल्लोष; आमदार यांच्यासह महिला, तरुण, वयोवृद्ध यांचा मोठा सहभाग

भर पावसात कर्जत शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन; मदारांच्या सह महिला, तरुण, वयोवृद्ध यांचा मोठा सहभाग
मोतीराम पादीर (कर्जत ग्रामीण) : 
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकने अक्षरश:शरणागती पत्करली.त्याचा जल्लोष म्हणून राज्यभरात भारतवासियांकडून ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात ही रॅली अत्यंत जल्लोषात पार पडली.कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे या रॅलीत सामील झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी यावेळी भारत माते की जय,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत यावेळी परिसर दणाणून सोडला.अतिशय जोश आणि देशाप्रती असलेली भावना यावेळी दिसून येत होती.
  कर्जत शहरातील प्रती आळंदी या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात झाली होती.कर्जत मुख्य बाजारपेठ कर्जत पोलीस ठाणे मार्गे रॅली निघून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून ही रॅली पुढे टिळक चौकातून कर्जत रेल्वे परिसरातून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली होती.शेकडोंच्या उपस्थीत निघालेल्या तिरंगा रॅलीत तरुणापासून वयोवृद्ध व्यक्ती,महिला वर्ग सामील झाले होते,यावेळी रिटायर भारतीय जवान देखील यामध्ये सामील होते. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना तिरंगा रॅलीत एक एक तरुण,ज्येष्ठ नागरिक,महिला वर्ग सामील होत जोडले जात होते. पावसाची तमा न बाळगता देशाप्रती असलेले प्रेम आणि भारतीय सैन्य दलावरील विश्वास येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकत होते. रॅलीतील सहभागी रिटायर जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पाकिस्तान मुर्दा बाद घोषणा देत, नारी के सन्मान मे सेना हे मैदान मे म्हणून परिसर दणाणून सोडला होता.आमदार महेंद्र थोरवे यांनी पहेलगाम हल्ल्याच्या घटनेवरून दहशतवाद्याने जात विचारून केलेला भ्याड हल्ल्याचा यावेळी निषेध केला. या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी सुरू केलेले मिशन सिंदूर आणि पाकिस्तान शहरात घुसून भारतीय सैन्य दलाने केलेली कारवाई मध्ये पाकिस्तानी लष्कराचे महत्वाचे स्थळ उडवून लावत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले.
आज पाकिस्तान भारतीय सैन्य दलाच्या दहशती खाली वावरत असून यापुढे असे नीच कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिक चोख उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही म्हणून मार्गदर्शन केले.यावेळी आमदार थोरवे यांनी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात सुरू झालेली आणीबाणी आणि यावेळी सर्व भारतीय एकवटले होते म्हणून आठवणींना उजाळा देत दाखला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *