बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी बातमी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून समोर आली आहे. आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने अखेर अत्याचार सहन न झाल्याने झालेल्या घटनेची माहिती तिने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला .व आईने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा खुलासा झाला.सावत्र बापास कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
वडील आणि लेकीच्या नात्याबद्दल कितीही सांगितलं किंवा चर्चा केली तरी शब्द अपुरे पडतील. पण काही विकृत माणसं या नात्याला हल्ली काळीमा फासणारे कृत्य करत आहेत. त्यांना आपल्या मुलीबद्दल किंवा परिवाराबद्दल काहीच वाटत नाही. ते वासनेत इतके आकांत बुडाले आहेत की, कुणासोबत आपण किती विकृत वागतो याचंही त्यांना भान राहत नाही. महाडमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील पीडित मुलगी हिची आई आणि सावत्र वडील यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्यामुळे ते एकत्र राहत आहेत. पीडित मुलीच्या आईसोबत राहणारा तिचा सावत्र बाप हा पीडित अल्प वयीन मुलगी ही झोपली असताना आरोपी यांने तीस स्वत: कडे ओढुन घेवुन वेळोवेळी पिडीत मुलगी हीची वेळोवळी लैगिक छळ केला आहे.
लैंगिक अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने सावत्र बापाचा सर्व प्रताप आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने सरळ नेरळ पोलिस ठाणे गाठत सावत्र बापाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी सावत्र बापास अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती नेरळ पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुरनं.117/2025, भा.न्या.स.कलम 64(2), (आय), (एम),65 (2), सह लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उप विभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भास्कर गच्चे करीत आहेत.