पोलादपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; सुनील तटकरे म्हणाले – “ये तो सिर्फ ट्रेलर है… पिक्चर अभी बाकी है”

Poladpur ncp & sunil tatkare
पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, शिवसेनेचे गोरक्षक दीपक उतेकर व तुर्भे खुर्द सरपंच गोविंद उतेकर यांनी माणगांव येथे कुणबी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. याप्रसंगी खा.सुनील तटकरे यांनी सर्वपक्षियांना ‘ये तो सिर्फ ट्रेलर है….पिक्चर अभी बाकी है…’ असा गर्भित इशारा दिला.
या पक्षप्रवेश सोहळयाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नानासाहेब तथा हनुमंत जगताप, कोकण संघटक ऍड.राजीव साबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, विधानसभा अध्यक्ष राजूशेठ कोरपे, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अण्णा अधिकारी, जिल्हा सरचिटणीस महादेव बक्कंम, युवक कार्याध्यक्ष शदाभाई गैबी, पोलादपूर नगरसेवक विरोधी पक्ष नेते दिलीप भागवत, महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडीक, पोलादपूर तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, खरवली सरपंच चैतन्य म्हामुणकर, आंबवडे सरपंच सचिन पवार, कोथेरी सरपंच अविनाश चौधरी, पोलादपूर तालुका युवक अध्यक्ष ऍड.सचिन गायकवाड, महाड तालुका अध्यक्ष मयूर निकम, पोलादपूर शहर अध्यक्ष स्वप्नील भुवड, नगरसेवक श्रावणी शहा, सान्वी गायकवाड, तेजश्री गरुड यांच्यासह जिल्हा, तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पोलादपूर तालुक्यातून पक्षप्रवेशासाठी लवाजमा माणगांव येथे रवाना झालेल्या प्रवेशकर्ते अनिल मालुसरे, दिपक उतेकर, तुर्भे खुर्द सरपंच गोविंद उतेकर, माजी सरपंच नरेंद्र पार्टे, माजी सरपंच दगडू उतेकर, माजी सरपंच भागुराम जाधव, बोरज उपसरपंच शिवाजी मालुसरे, माजी उपसरपंच पांडुरंग मालुसरे, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत उतेकर, उपतालुका प्रमुख प्रवीण महाडिक, उपविभाग प्रमुख स्वप्नील उतेकर, युवासेना अक्षय करंजे, युगज्ञा उतेकर, प्रताप उतेकर, दत्ताराम उतेकर, मधुकर उतेकर, नामदेव उतेकर, अनाजी उतेकर, सुभाष उतेकर, आत्माराम उतेकर, विपुल उतेकर, भगवान उतेकर, हरिश्चंद्र उतेकर, अक्षय मोहिते, ललित कदम, संदीप उतेकर, रितेश पाटेकर, विशाल कोंडाळकर या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते स्वरूप खांबे यांची विधानसभा युवक अध्यक्ष तसेच विनय पुरारकर जिल्हा युवक सरचिटणीसपदी तर सारिका विचारे यांची पोलादपूर महिला शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *