पोयनाड बीटातील भाकरवड अंगणवाडीत ‘इ-आकार रॉकेट लर्निंग’ टीमची भेट; मातृभाषेत शिक्षणावर भर

भाकरवड | जीवन पाटील

पोयनाड बीटातील भाकरवड अंगणवाडी केंद्राला इंटर नॅशनल लेव्हल ‘इ-आकार रॉकेट लर्निंग’ कमिटीने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी भेट देत शिक्षण पद्धतीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. या भेटीत USA येथील मिस्टर लुकेन, मिस रुबेका, मिस सुप्रिया यांच्यासह इ आकार रॉकेट लर्निंग टीम उपस्थित होती.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अलिबाग माननीय शर्मिला पाटील (पिंगळे), बीट परीक्षिका सामिया पेरेकर, शिक्षण तज्ञ अरुण राऊत, अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, मदतनीस समिता पाटील तसेच विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
टीमने सुमारे दोन ते अडीच तास अंगणवाडीतील विविध कृतींचे निरीक्षण केले. ‘इ-आकार’ अभ्यासक्रमाद्वारे मुलांना शिकवण्याच्या पद्धती, मुलांची वही, लेखन-अभ्यास, बडबडगीते व भाषणे यांचे परीक्षण करण्यात आले. मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या कौशल्यांचे कौतुक करण्यात आले.
पालकांशी संवाद साधताना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. टीमने बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस आणि पालकांचे अभिप्रायही जाणून घेतले.
यावेळी ‘इ-आकार’ टीमकडून विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात पोयनाड बीटातील सर्व अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले.