Skip to content
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
नेव्हल डॉकयार्ड मुंबईच्या डॉकयार्ड अॅप्रेंटिस स्कूलमध्ये अॅप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी एकूण २८६ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. लेखी परीक्षा २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत होणार असून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना १ डिसेंबर २०२५ पासून प्रशिक्षणास प्रारंभ होईल.
नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ८ वी उत्तीर्ण (९ जागा), १० वी उत्तीर्ण (१९ जागा) आणि आयटीआय उत्तीर्ण (१५८ जागा) अशा मिळून एकूण २८६ अॅप्रेंटिसशिप जागांसाठी प्रवेश घेण्यात येणार आहे.
🔹 अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे
अर्जदारांना https://applicationportal.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करून अर्ज करावा लागणार आहे.
अर्जाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे.
अर्जासोबत फोटो, आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रके, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करणे बंधनकारक आहे.
🔹 निवड प्रक्रिया
प्रीलिमिनरी गुणवत्ता यादी ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रसिद्ध होईल.
प्रीलिमिनरी यादीतील उमेदवारांपैकी २० पट उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाईल.
लेखी परीक्षा २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत होईल. ही परीक्षा ओएमआर पद्धतीवर आधारित, १०० गुणांची आणि २ तासांची असेल.
विषय : सामान्य ज्ञान (३५ गुण), गणित (३५ गुण), सामान्य बुद्धिमत्ता (३० गुण).
चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल.
लेखी परीक्षेनंतर १३ दिवसांनी अंतिम गुणवत्ता यादी व २० उमेदवारांची प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
🔹 इतर महत्त्वाची माहिती
अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
प्रशिक्षणास १ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात होईल.
मासिक स्टायपेंड :
आयटीआय उत्तीर्ण – ₹७,०००/-
८ वी/१० वी उत्तीर्ण – ₹६,०००/- (दुसऱ्या वर्षी ₹६,६००/-)
उमेदवारांनी कोणत्याही शंका किंवा तक्रारीसाठी navaldockyard2025@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे नेव्हल डॉकयार्ड प्रशासनाने कळविले आहे.
Related
Tags: #Admission for 286 apprenticeship training at Naval Dockyard Mumbai , #Apprenticeship2025 , #ApprenticeTraining , #GovtJobs , #ITIJobs , #JobOpportunity , #MumbaiRecruitment , #NavalDockyard , #SkilledTrades , #अॅप्रेंटिसशिप , #नेव्हल डॉकयार्ड मुंबईत २८६ अॅप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी प्रवेश , #नेव्हलडॉकयार्ड , #नोकरीचीसंधी , #भरती२०२५ , #महाराष्ट्रभरती , #मुंबईभरती , #शिक्षणआणिनोकरी , #सरकारीनोकरी
Post navigation