निसर्गरम्य दिवेआगर–वेळास आगर खाडीवर पूल होणार कधी? नागरिकांचा सवाल; ५ किलोमीटरचा प्रवास अवघ्या ३ मिनिटांत शक्य!

When will a bridge be built across the creek between the picturesque locations of Diveagar and Velas-Agar?
वेळास-आगर | संतोष शिलकर
श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाची सुवर्ण भूमी मौजे-दिवेआगरच्या बरोबरीने आता वेळास आगर बीच पर्यटकांना खुणावत आहे. मौजे-वेळास-आगर आणि दिवेआगर मध्ये छोटी खाडी आहे.अतिशय सुंदर आणि देखण्या खाडीवर पूल व्हावा अशी कित्येक वर्षां पासून या प्रस्थावित पूलाची मागणी आहे.यामुळे पाच किलो मीटरचा प्रवास केवळ तीन मिनिटात होणार आहे.त्या बरोबरच श्रीवर्धन,हरिहरेश्ववर,मुरुड-जंजिरा येथे आलेल्या पर्यटकांचा ओघ दिवेआगर,वेळास,आदगांव कडे असतो.या खाडीवर पूल झाल्यास वेळास-आगर येथील सुंदर समुद्र किनाऱ्याचा मनमुराद आनंद,आस्वाद घेता येणार आहे.त्यामुळे वेळास गावाला पर्यायाने पंचक्रोशीतील गावांना त्याचा फायदा होणार आहे.
या बाबतचे वृत्त १९८० च्या दशकातील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ऐ.आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग,आताचा बहुचर्चेत असलेला कोस्टल हायवे,या मार्गावरील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर-वेळास आगर खाडी वरील हा त्या काळापासून प्रस्थावित पूल.परंतु बॅ.अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अल्प कालावधी मुळे या मार्गाच्या कामाला चालना न मिळाल्याने रेवस ते रेड्डी मार्गावरचा या खाडी वरील पूल राज्य शासनाच्या कागदावरच राहिला होता.मात्र गेल्या २०/२५ वर्षातील सरकारच्या काळात कोस्टल हायवे महामार्ग पुन्हा चर्चेत येऊ लागला.आता त्याला गती प्राप्त झाली या मार्गाचे काही ठिकाणी जोरदार कामं सुरू आहेत.काही पुलांच्या कामांना सुरवात झाली.
सन नोव्हेंबर १९९७ रोजी दिवेआगर येथे सुवर्ण गणेश मूर्ती एका नारळी-फोपळीच्या बागेत सापडली आणि दिवेआगरला पर्यटकांचा ओघ वाढु लागला.महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या इतर प्रांतातुन असंख्य श्रद्धावान गणेश भक्त दर्शना साठी येऊ लागले.
श्रीवर्धन तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे.निसर्गरम्य समुद्राला शुभ्र वाळूचा किनारा लाभला आहे.हिरव्या गार नारळी-फोपळीच्या बागा,लगत सुरुंची लागवड जणू हिरवीगार किनार असलेला पदरच.निळ्याशार शुभ्र फेसाळलेल्या लाटा अशा नयनरम्य सौंदर्याने इथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाला भुरळ घातली आहे.आणि बघता बघता दिवेआगर एक सुंदर,रमणीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलं. श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढु लागला.
[ दिवेआगर लगत असलेल्या वेळास गावात दिवेआगर वासियांची भातशेती,आंबा,नारळाच्या बागाही आहेत.रोजगाराचा साधन म्हणून वेळास परिसरातील काही मंडळी रोजगारा साठी दिवेआगरला जात-येत असत.हे लोक कित्येक वर्षे या खाडीतून होडीने प्रवासी प्रवास करत असत.मात्र अंदाजे २०/२५ वर्ष या खाडीतील होडी वाहतूक काही कारणाने बंद झाल्याने वेळास-दिवेआगर ये-जा प्रवास बंद झाला.आणि पाच मिनिटांचा प्रवास पाच कि.मीटरने दूर गेला.शिवाय खर्चिक झाला.राज्य सरकार व पर्यटन विकास खात्याने या गंभीर समस्येचा विचार करावा.] 
वेळास-आगरच्या कुशीत असलेला हा समुद्रकिनारा शुभ्र वाळू, निळ्याशार फेसाळलेल्या लाटा, हिरव्या गार नारळी-पोफळीच्या बागा, सुरूंचे बन आणि निरव शांतता असलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावतोय.म्हणून या खाडीवर पूल झाल्यास पर्यटनात वाढ होईल.शिवाय इथे असलेल्या श्रुष्टी सौंदर्यात आणखी भर पडेल. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे  हे या पुलाचा आवर्जून उल्लेख लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सभेतून व पत्रकार परिषदेत करत आले. मात्र आता होत नसल्याने नारिकांच्या पुढे प्रश्न उभा आहे.व प्रतीक्षा कायम आहे.श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार,महिला व बाल कल्याण मंत्री ना.कु.अदितीताई तटकरे,आमदार अनिकेत तटकरे तसेच रोजगार हमी,खारभूमी विकास व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी या महत्वाच्या पूर्व नियोजित पुल होण्यास प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.
यामुळे श्रीवर्धन समुद्र किनारपट्टी लगत असलेल्या दिघी ते बागमांडले,हरिहरेश्वर मार्गावरील नानवली, सर्वे, आदगांव, वेळास, दिवेआगर, भरडखोल, शेखाडी,कोंडविली, आरावी, वाळवटी गावांच्या एकंदरीतच श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यांतील नागरिकांना रोजगाचा फायदा होईल. याकरिता आगर-वेळास,दिवेआगरच्या सुंदर खाडीवर अति महत्वाचा पूल व्हावा.यासाठी स्थानिक नागरिकांची राज्य सरकार कडे जोरदार विनंती वजा मागणी होत आहे..